महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे मेट्रो उद्घाटनानंतर दिला 'हा' अभिप्राय - pune metro inauguration pm modi feedback

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि नंतर पुणेकरांना शुभेच्छा देऊन अभिप्राय दिला आहे.

pune metro pm narendra modi feedback
पुणे मेट्रो नरेंद्र मोदी अभिप्राय

By

Published : Mar 6, 2022, 6:35 PM IST

Updated : Mar 6, 2022, 7:12 PM IST

पुणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मुख्य आणि महत्त्वाचे समजले जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि नंतर पुणेकरांना शुभेच्छा देऊन अभिप्राय दिला आहे.

अभिप्राय

हेही वाचा -PM Modi Students meet Pune : 'पंतप्रधानांशी भेटीचा विश्वास बसत नव्हता; विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पुणे शहरात आजपासून अंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सेवा सुरू होत आहे. याचा मला आनंद आहे. पुणे शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल अशा शहरी वाहतुकीचे साधन उपलब्ध होत आहे. मेट्रो सेवेच्या यशस्वी संचालनासाठी मी सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो, असा अभिप्राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

हेही वाचा -Ajit Pawar Demand Pm Modi : अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या 'या' मागण्या

Last Updated : Mar 6, 2022, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details