महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाबासाहेबांनी महाराजांचे विचार अनेकांपर्यंत पोहचविले - पंतप्रधान नरेंद्र मोदी - पुणे बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेबांनी हे अद्भत असे काम करुन ठेवले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. बाबासाहेबांनी महाराजांचे विचार समाजात पोहचवून सर्वाना जागृत केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Aug 13, 2021, 5:55 PM IST

पुणे -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी आपल्याला शिवचरित्राच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास दाखविला. त्यांचे विचार, शौर्यगाथा घराघरात पोहचविले, अशा व्यक्तीमुळे हा इतिहास जीवंत आहे, असा गौरवउद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काढले असून त्यांनी या अव्दितीय कार्याला वंदन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यातून प्रेरित होऊन आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. बाबासाहेबांनी हे अद्भत असे काम करुन ठेवले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. बाबासाहेबांनी महाराजांचे विचार समाजात पोहचवून सर्वाना जागृत केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी आभासी स्वरुपात बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या.

पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दी वर्षाला आज (शुक्रवारी) तिथीनुसार सुरूवात झाली असून त्यांच्या विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन कात्रज येथील शिवसृष्टी परिसरात करण्यात आले होते. यावेळी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, जगदीश कदम उपस्थित होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाबासाहेबांना कवड्याची माळ, फुलांचा हार आणि पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी शंभर दिव्यांनी त्याचे औक्षण केले. दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिले. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार उदयनराजे यांनीही पत्र स्वरुपात शुभेच्छा दिले. शिवशाही बाबासाहेबाचे हे कार्यपाहता त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सांस्कृतिक विभागातर्फै शिवाजी महाराज यांच्या कार्यावर जो कोणी व्यक्ती संशोधन करेल, याकरिता स्कॉलरशिप म्हणून अठरा लाख रुपये दिल जातील, असे खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी यावेळी जाहीर केले.

आयुष्याच्या या शंभरीच्या वाटेवर असताना महाराजांच्या गाथा, विचार, मला पाहता आले आणि आत्मसात करुन ते मला जगता आले, याचा आनंद मला होत असून पुण्यात ही शिवसृष्टी माझ्या देखत पुर्ण झाली तर मी आनंदी होईल आणि हा ठेवा नव्या पिढीला देईल, याचा भाग्य मला मिळेल अशा शब्दांत बाबासाहेबांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details