महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

cow baby shower ceremony : पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण, शिरूर तालुक्यातील शिंदे कुटुंबाचं स्तुत्य उपक्रम - गाईचं डोहाळं जेवण

पहिल्या बाळंतपणाला गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात तसं काही नवं नाही. पण कधी तुम्ही एखाद्या गाईचं डोहाळ जेवण घातल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का? हो हे खरं आहे. शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी (भोसेवस्ती) येथील शिंदे कुटुंबाने आपल्या लाडक्या गाईंचं डोहाळं जेवण घालून संपूर्ण गावासमोर आदर्श उभा केला आहे.

pregnent cow baby shower ceremony in pune
पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण

By

Published : Feb 2, 2022, 3:27 PM IST

पुणे - पहिलं बाळंतपण म्हटलं की सगळं घर डोहाळं जेवणाची तयारी करतात. पहिल्या बाळंतपणाला गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात तसं काही नवं नाही. पण कधी तुम्ही एखाद्या गाईचं डोहाळ जेवण घातल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का? हो हे खरं आहे. शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी (भोसेवस्ती) येथील शिंदे कुटुंबाने आपल्या लाडक्या गाईंचं डोहाळं जेवण घालून संपूर्ण गावासमोर आदर्श उभा केला आहे.

पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण

गाईच्या डोहाळे जेवणाचा आनंद -
पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी शिंदे कुटुंबातील शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा आनंद साजरा केला. यासाठी त्यांनी चक पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं. आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी जवळच्या 21 लोकांना आमंत्रित केलं. शिंदे दाम्पत्याने मायेपोटी चक्क गायीचे डोहाळे पुरवले आणि गोड जेवण दिलं.शिंदे यांची विडीमध्ये शेती आहे. स्वतःच्या मुलांप्रमाणेच शिंदे दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात. गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असं सांगत विठ्ठलवाडीच्या शिंदे दाम्पत्याने मायेपोटी चक्क गायीचे डोहाळे पुरवले आणि गोड जेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिले आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.

असा केला डोहाळे -डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटणं आलंच. या गायीला फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून साडी बाहून छान नटवण्यात आलं. एक-एक करत 7 महिलांनी गाईची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर पाच प्रकारची फळे तसेच मका, पेंड, भुसा, चारा, दूध, बाडे, गवत, गहु, ज्वारी, बाजरी, हरभरा यांचा खुराक गाईला खाऊ घालण्यात आला.


ABOUT THE AUTHOR

...view details