पुणे - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Controversial Statement ) यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatshing Koshyari ) यांच्यावर विविध पक्षांवर टीका केली जातं आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन केले आहे.
आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही -ते म्हणाले की. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजप यांचं राज्यात सरकार राहील. मुख्यमंत्री देखील याच पक्षांचे राहिले आहे आहेत. अधिकांश मंत्री हे मराठा समाजाचे राहिले आहे. त्यामुळे यांनी राज्यात राज्य कस केलं यावर केलेलं हे विधान आहे. राज्य जरी मराठ्यांचे असले तरी, आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही तर, ती राजस्थानी, गुजराथी लोकांच्या हाती आहे. हे दाखवण्यात आल आहे. त्यामुळे या सगळ्यांना आपल पित्तळ उघड पडल म्हणून राज्यपाल यांची उचलबांगडी करा अस म्हणत आहे. आम्ही राज्यपालांच्या विधानाचे समर्थन करत आहोत असे, यावेळी आंबेडकर म्हणाले.
मुंबईला काहीही फरक पडत नाही -पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुंबई आत्ता मॅन्युफॅक्चरिंग शहर राहिलेला नाही. तर, मुंबई शहर हे आता ट्रेडिंग शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे या ट्रेडिंग शहरावर कोणाचंही वर्चस्व राहिलेले नाही. त्यामुळे जरी येथील राजस्थानी गुजराथी गेले तरी, मुंबईला काहीही फरक पडत नाही असे, देखील यावेळी आंबेडकर म्हणाले. राज्यपाल यांच्या विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत असताना आंबेडकर यांनी त्यांच्या विधनाचा समर्थन केलं आहे.
महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले -आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केलं आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.