पुणे -सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते. मराठा आरक्षणाबाबत जी दक्षता घ्यायला हवी होती, ती घेतली गेली नाही, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अपेक्षीतच होता. मात्र यामुळे गरीब मराठा समाजावर अन्याय झाला अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.
आरक्षण रद्द झाल्यामुळे गरीब मराठा समाजावर अन्याय 'सरकारला आरक्षण द्यायचेच नव्हते'
या सरकारने आणि मागील सरकारने ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळला, ते पाहता त्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नव्हते असे आंबेडकर यावेळी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने यापूर्वी एक निर्णय देताना ओबीसी कमिशन गठीत केले होते. ज्याला ज्याला आरक्षण पाहिजे त्याने या कमिशनमार्फत यावे अशी सूचना केली होती. मात्र राज्य सरकारने गायकवाड कमिशन असेल किंवा राणे कमिशन मराठा आरक्षणासाठी नेमले, मात्र या कमिशनचा आणि न्यायालयाने नेमलेल्या कमिशनचा काही संबंध नव्हता. भाजपकडून मराठा आरक्षणाबाबत व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया या मगरमच्छ के आसून आहेत. देशात आरक्षण नकोच अशी भाजपाची भूमिका असल्याचेही यावेळी आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -अधिकाऱ्यांना तुरुंगात ठेवल्याने दिल्लीत ऑक्सिजन येऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय