पुणे - जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) कार्यालयासमोरच्या झाडावर प्रहार जनशक्ती पक्ष ( Prahar Jan Shakti Party ) भोर तालुका यांचे झाडावर चढून तीव्र आंदोलन सुरू आहे. प्रहारचे तालुका अध्यक्ष संतोष मोहिते व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आंदोलन सुरू आहे. भोर येथील छोटे पाटबंधारे यांचा तलावाचे काम अपूर्ण असतानाच त्यातील रक्कम काढली गेली आहे. या भ्रष्टाचाराला ( Corruption ) कारणीभूत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत प्रहारचे आंदोलन सुरू आहे.
झाडावर चढून आंदोलन -भोर तालुक्यातील भोंगवली गावामध्ये छोटे बंधारे तलावाचे काम अपूर्ण असताना, त्यातून अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये संगणमताने सहमतीने रक्कम काढली आहे. त्यातून निकृष्ट काम झाले आहेत, असा या कार्यकर्त्यांचा प्रशासनावर आरोप ( Accusations administration )आहे. याची चौकशी व्हावी आणि हे जे गुत्तेदार, ठेकेदार कारवाई करण्यात यावी. ते शासकीय अधिकाऱ्याचं ( Government officials ) मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही, असा आरोपी आता या आंदोलनामध्ये केला आहे.
जिल्हा परिषदेच्या समोरच हे आंदोलन झाडावर चढून करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांना आता जिल्हा परिषदेच्या शिवमार्फत जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.