महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उन्हाळा सुरू होऊनही माठ विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेतच - गरिबांचे फ्रिज

शहरात या वर्षी उन्हाचा पारा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वर चढत आहे. यामुळे गरिबांचे फ्रिज ( Earthen water pot less demand pune) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढेल, अशी आशा विक्रेत्यांना लागली आहे. पण, कोरोना निर्बंध शिथिल होऊनही माठ विक्री व्यावसायिकांना ग्राहकांची वाट पहावी लागणार आहे.

less customers pot vendors pune
माठ विक्री पुणे

By

Published : Mar 20, 2022, 8:40 AM IST

पुणे - शहरात या वर्षी उन्हाचा पारा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वर चढत आहे. यामुळे गरिबांचे फ्रिज ( Earthen water pot less demand pune) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढेल, अशी आशा विक्रेत्यांना लागली आहे. पण, कोरोना निर्बंध शिथिल होऊनही माठ विक्री व्यावसायिकांना ग्राहकांची वाट पहावी लागणार आहे.

माहिती देताना माठ विक्रेते

हेही वाचा -HSC Center Changed In Pune : पुणे तिथे काय उणे; चक्क बारावीचे परीक्षा केंद्रच बदलले?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच व्यवसाय बंद होते. कुंभारांना देखील याचा फटका बसला. पण, काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले असताना उन्हाळा सुरू झाला तरी कुंभाराला ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी जे दर माठाचे होते तेच दर आत्ताही आहे. तरी, ग्राहक खूप कमी येत आहे. कोरोनामुळे जे दोन वर्षे व्यवसाय ठप्प होता त्याचा अजूनही फटका बसत असल्याचे यावेळी विक्रेते सांगत आहे.

पुण्यातील कुंभारवाडा येथे मोठ्या प्रमाणात पिढ्यानपिढ्या माठाच व्यवसाय होत आहे. अनेक छोटे मोठे रंगबिरंगी माठ बनविले जातात. छोटा माठ 150 रुपये तर मोठा माठ 300 रुपये या किंमतीने विकला जातो. पण यंदा पेट्रोल - डिझेलच्या वाढीचा फटका काहीसा या माठावर देखील झाला असून त्यांच्या किंमतीत देखील 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला 150 ते 200 माठ विक्री होत होते. यंदा सिझनची सुरवात होऊनही दिवसाला 30 ते 40 माठ विक्री होत आहे, असे एका विक्रेत्याने यावेळी सांगितले.

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या पुण्याच्या नदी सुधारणा प्रकल्पाला का देण्यात आली आहे स्थगिती? पहा स्पेशल रिपोर्ट..

ABOUT THE AUTHOR

...view details