पुणे - विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विद्या विभागाचे दोन प्रमुख मुख्य भाग असून, त्यातील एक भाग म्हणजे रानडे इन्स्टिट्यूट आहे. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मास कॉम डिप्लोमा आणि मास कम्युनिकेशन डिग्री असे दोन विभाग आहेत. सदर ही जागा भाड्याची असून, ती रानडे इन्स्टिट्यूटने भाडेतत्त्वावर घेतली होती. आता या भाडेकराराची मुदत संपली असून, सदर विभाग हे पुणे युनिवर्सिटी येथील मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये हलवण्याचे सत्र सध्या विद्यापीठात सुरू आहे. मात्र, रानडे इन्स्टिट्यूटमधील माजी विद्यार्थ्यांनी या स्थलांतराला प्रचंड विरोध केला आहे
रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरावरून वादंग, विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध तीव्र आंदोलन
या विभागाच्या जागेबाबत राजकारण केले जात आहे. ही जागा ही मॉल किंवा बिल्डर लॉबीच्या हातात जाईल अशी त्यांना शंका वाटते. याविरोधात माजी विद्यार्थ्यांनी आणि काही संघटनांनी तीव्र आंदोलन केले. यावर उपाय म्हणून सद्यस्थितीला रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतरण प्रक्रियेवर स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, काही कालावधीनंतर याबाबत निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.वि
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय आहे
विद्यापिठातुन ये-जा करणे हे सामान्य विद्यार्थ्याला अवघड होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जरी नावाजलेले विद्यापीठ असले, तरी येथे सार्वजनिक वाहतुकीची कमतरता आहे. मुलींसाठी रात्री किंवा दुपारी प्रवास करणे धोक्याचे आहे. तसेच, फर्ग्युसन रस्ता हा वर्दळीचा असून, येथून प्रत्येक पत्रकारिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वृत्तपत्रात internship करण्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे हा विभाग हलवणे चुकीचे आहे.
परिपत्रकावर कुलगुरूंची सही का नाही?
रानडे इन्स्टिट्युट स्थलंतरणाला जरी स्थगिती दिल्याचे परिपत्रक यांनी दिले असले, तरी विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की जर तुम्ही हे परिपत्रक काढले आहे तर विद्यापीठाच्या वेबसाईटवर हे परिपत्रक का नाही टाकले? या परिपत्रकावर कुलगुरूंची सही का नाही? सदर परिपत्रकाची प्रत पब्लिश का केली नाही? असे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर सध्या गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, बऱ्या गदारोळानंतर तुर्तास या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, याबाबत आता पुढील निर्णय काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.