पुणे -आज जे श्रीलंकेत परिस्थितीती निर्माण ( Political instability In Sri Lanka) झाली आहे. त्यातील दोन ते तीन कारणे समोर येत आहे. श्रीलंकेवर कर्ज वाढत गेले आहे. त्यामुळे देशात महागाईने कळस गाठला आहे. त्यांचे फॉरेनस एक्सचेंज रिझल्ट कमी होत गेले आहेत. ज्यामुळे तिथं परिस्थितीती बिकट होऊ लागली. जी परिस्थितीती श्रीलंकेत निर्माण झाली आहे, तशीच परिस्थितीती भारतात देखील निर्माण शकते असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह ( Senior Congress leader Digvijay Singh ) यांनी व्यक्त केलं आहे. भारताचे कर्ज 36 लाख करोड वरून 80 लाख करोडवर गेले आहे. दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ होताना दिसत आहे. जर, मोदी सरकारने केंद्रात लक्ष दिले नाही तर, श्रीलंकेसारखी परिस्थीतीती भारतात निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असेही सिंह म्हणाले. ते आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदे बोलत होते.
देशात लोकतंत्र नव्हे तर धनतंत्र सुरू -गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या संपर्कात असून या मंत्र्यांनी भाजपाकडे तीन कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर दिग्विजय सिंह ( Digvijay Singh ) यांना विचारलं असता ते म्हणाले की, जे आमदार गेले आहेत. त्यातील किती लोकांवर ईडीच्या तक्रारी आहे? किती लोकांवर छापे टाकले आहे? सध्या भाजपकडून ( BJP ) जे सुरू आहे ते लोकतंत्र नव्हे तर धनतंत्र सुरू असल्याची टीका देखील सिंह यांनी केली.