पुणे - शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय सूत्रे मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या निकालाने पुण्याची समीकरणं बदलणार? शहरातील पाच नगरसेवक विधानसभेवर आमदार म्हणून गेले असून, यामध्ये दोन राष्ट्रवादी व दोन भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात आपली पकड पुन्हा मजबूत केल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेसनेही एक जागा वाढवत जिल्ह्यात बस्थान बसवले आहे.
शहरातील आठ विधानसभांपैकी राष्ट्रवादीने दोन जागा खेचून आणल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाची ताकद पुन्हा वाढणार आहे.
तसेच काँग्रेसने दोन ठिकाणी जोरदार टक्कर दिल्याने भाजप व शिवसेनेला कष्टाने विजय ओढून आणता आला. शिवसेनेच्या वाट्याला शहरातून एकही जागा न आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारणात बदल होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय अभ्यासक मनोज आवळे यांच्याशी बातचीत केली आहे.