पुणे:गाडी बाजूला घेण्याच्या कारणातून झालेल्या वादात पेट्रोल पंपचालकाला मारहाण Police Beaten Petrol Pump owner in Pune करून त्याच्या विरुद्धच खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार्या पोलिसावरच आता पाच लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (Extortion Case on Pune Police employee) झाला आहे. खात्याअंतर्गत केलेल्या चौकशीत (Extortionist Police Investigation) हा धक्कादायक प्रकार समोर आला असून संबंधित कर्मचार्याला पोलिस खात्यातून देखील निलंबित (Extortionist Police Suspension Pune) करण्यात आले आहे. latest crime news Pune
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल-प्रदीप रावसाहेब मोटे (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्माचार्याचे नाव आहे. याबाबत लोहगाव येथील पेट्रोप पंपचालक काळूराम दत्तात्रय खांदवे (वय 35, रा. कोपरआळी, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात (दि.19) लोहगाव परिसरातील जगद्गुरु पेट्रोलपंपासमोर घडला होता. मागच्या महिन्यात पेट्रोल पंपासमोर लावलेली कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत पाच जणांनी मिळून पोलिस कर्मचार्याला मारहाण केली होती. याबाबत मोटे याने दिलेल्या फिर्यादीनुसार कालिदास खांदवे, माऊली खांदवे व इतर तिघे अशा पाच जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिस कर्मचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला होता.