महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MHADA Paper Leak 2021 : सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक डॉ. प्रितेश देशमुखच्या घरात सापडले पोलीस भरतीचे कागदपत्र - महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा पेपर फुटी ( MHADA Paper Leak ) प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी ( Pune Police ) पेपर फुटण्यापूर्वीच तिघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत कोडवर्डमध्ये बोलले जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे काही परिक्षार्थी उमेदवारांचे ओळखपत्रक व इतर साहित्य मिळून आले होते.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Dec 20, 2021, 9:41 AM IST

पुणे - म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी जी. ए टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक डॉ. प्रितेश देशमुख यांच्या घरातील झाडाझडती केल्यानंतर विविध प्रकारणे बाहेर येत आहेत. पहिल्या दिवशी काही सॉफ्टवेअर आणि टीईटीच्या परिक्षेबद्दल काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले तर काल पून्हा घराची झाडाझडती केली असता देशमुख यांच्या घरी पोलीस भरतीची ओळखपत्रे सायबर पोलिसांना सापडली आहेत. त्यामुळे आता म्हाडाची टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

इतर काेणत्या ठिकाणी गैरप्रकार झाला का, याबाबत पोलिस तपास करणार

जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घरातून आता (सन २०१९ व २०२१)च्या पोलीस भरती परीक्षेतील तीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तत्पूर्वी त्याच्या घरी टीईटी परीक्षांची अपात्र परीक्षार्थींची ओळखपत्रे, हाॅलतिकीट सापडले होते. यामुळे पोलीस भरती परीक्षेतील मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीने राज्यात काेल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, साेलापूर आदी ठिकाणी पाेलीस भरती परीक्षा घेतल्या होत्या. पुण्यासह काही ठिकाणी पाेलिसांनी परीक्षा पद्धतीवर लक्ष ठेवल्याने गैरकारभारास वाव मिळाला नाही. मात्र, इतर काेणत्या ठिकाणी गैरप्रकार झाला का, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

झडतीत विविध बाबी येत आहे समोर

प्रितेश देशमुखच्या घर व कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये २३ हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, ४१ सीडी व इतर कागदपत्रे सापडले आहेत. हरकळचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या परीक्षांची कागदपत्रे, उमेदवारांच्या याद्या व पेनड्राइव्ह आदी साहित्य हस्तगत केले आहे.

परिक्षार्थी उमेदवारांचे ओळखपत्रक व इतर साहित्य मिळून आले

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा पेपर फुटी ( MHADA Paper Leak ) प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी ( Pune Police ) पेपर फुटण्यापूर्वीच तिघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत कोडवर्डमध्ये बोलले जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे काही परिक्षार्थी उमेदवारांचे ओळखपत्रक व इतर साहित्य मिळून आले होते.

काय आहे प्रकरण..?

म्हाडाकडून डॉ. प्रितीश देशमुख याच्या जीए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीला परिक्षा घेण्यासाठी कंत्राट दिले होते. त्यानेच हॉलतिकीट देणे, प्रश्न पत्रिका पुरविणे व परिक्षा झाल्यानंतर ती पुन्हा घेणे त्यानंतर निकाल लागल्यानंतर ते प्रसिद्ध करण्याचे काम त्या कंपनीकडे होते. रविवारी (दि. 12) दोन सत्रात परिक्षा होणार होती. कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार होती. पण, त्यापूर्वी पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. 11) मध्यरात्रीच या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही परिक्षार्थी उमेदवारांचे ओळखपत्रक व इतर साहित्य मिळून आले होते. त्यानंतर हा पेपर फोडण्याचा डाव उधळण्यात आला. आता त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

'घर' आणि 'वस्तू' असे कोडवर्ड

पोलिसांच्या तपासात उमेदवारांशी तसेच शिकवणी संस्थेशी संपर्क साधताना थेट परिक्षेबाबत न बोलता कोडवर्ड भाषेत बोलण्यात येत होते. तसेच, अनेकांचे क्रमांकही कोडवर्डनुसार सेव्ह केल्याचे दिसून आले आहे. आरोपींमध्ये झालेले संभाषण मिळाले असून, त्यात हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका तसेच पैशांबाबत बोलणे झाले होते. त्यानुसार पोलीस या तिघांकडे चौकशी करत आहेत. म्हाडा शब्दासाठी आरोपींनी “घर” आणि पेपर शब्दासाठी “वस्तू”, असे कोडवर्ड ठरविले होते. त्यासोबतच आरोपींनी पदानुसार पैसे ठरविले असल्याची शक्यता आहे. अभियंता पदासाठी लाखो रुपये ठरल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -Parab Vs Kadam : पक्षांतर्गत खदखद वाढवणार शिवसेनेची डोकेदुखी.. कदम-परब संघर्षात पक्षाची कोंडी

ABOUT THE AUTHOR

...view details