महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2021, 4:19 AM IST

ETV Bharat / city

पूजा चव्हाणच्या मृत्यूचा सविस्तर अहवाल पोलिसांच्या हाती

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा सविस्तर अहवाल आता पुणे पोलिसांच्या हाती आला आहे. सुरुवातीला आलेल्या प्राथमिक अहवालात जबर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर सविस्तर आलेल्या अहवालातही पूजाच्या मृत्यूचे कारण गंभीर दुखापतच असल्याचे म्हटले आहे. मणक्याला आणि डोक्याला मार लागल्यामुळे पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे या सविस्तर अहवालात म्हटले आहे.

पूजा चव्हाण
पूजा चव्हाण

पुणे -पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा सविस्तर अहवाल आता पुणे पोलिसांच्या हाती आला आहे. सुरुवातीला आलेल्या प्राथमिक अहवालात जबर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर सविस्तर आलेल्या अहवालातही पूजाच्या मृत्यूचे कारण गंभीर दुखापतच असल्याचे म्हटले आहे. मणक्याला आणि डोक्याला मार लागल्यामुळे पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे या सविस्तर अहवालात म्हटले आहे.

पूजाने सात फेब्रुवारी रोजी वानवडी येथील राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु पूजासोबत राहणाऱ्या अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात जोडले गेले. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागलं.

संजय राठोड यांचा राजीनामा

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याप्रकरणी आक्रमक होत, संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही जोर धरू लागली होती. अखेर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान आता राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details