पुणे - शहरापासून जवळच असणाऱ्या कुडजे गावातील एका फार्म हाऊसवर सुरू असणाऱ्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना डीजे सिस्टीमच्या तालावर नाचताना काही मुली आढळून आल्या. पोलिसांनी या ठिकाणाहून डान्स करण्यासाठी आणलेल्या पाच मुलींची सुटका केली तर एका तरुणीसह 9 जणांना अटक करण्यात आली. उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली.
मंगेश राजेंद्र सहाने (वय 32), निखिल सुनिल पवार (वय 33), ध्वनित समीर राजपूत (वय 25), सुजित किरण अंबवले (वय 34), निलेश उत्तमराव बोर्धे (वय 29), आदित्य संजय मदने (वय 24), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय 39), विवेकानंद विष्णू बडे (वय 42) आणि प्राजक्ता मुकुंद जाधव (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडजे गावातील लफडे फार्महाऊसवर डीजे सिस्टीमचा तालावर काही मुली डान्स करतात याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या फार्म हाऊसची झडती घेतली असता याठिकाणी बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसायही सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणाहून दारूच्या बाटल्या, डीजे सिस्टीम, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे.
पुण्यात फॉर्म हाऊसवर सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा, पाच मुलींची सुटका तर नऊ आरोपी अटकेत - पुण्यात फॉर्म हाऊसवर सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा
कुडजे गावातील एका फार्म हाऊसवर सुरू असणाऱ्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना डीजे सिस्टीमच्या तालावर नाचताना काही मुली आढळून आल्या. पोलिसांनी या ठिकाणाहून डान्स करण्यासाठी आणलेल्या पाच मुलींची सुटका केली तर एका तरुणीसह 9 जणांना अटक करण्यात आली. उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली.
पुणे
या फार्म हाऊसचे व्यवस्थापक समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे आणि विवेकानंद विष्णू बडे यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. आरोपी प्राजक्ता मुकुंद जाधव ही डान्सर मुली घेऊन या ठिकाणी आली होती. या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता तीन मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.