पुणे - पाषाण परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअरसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, चार पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली आहे.
पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक, चार महिलांची सुटका
रविकांत बालेश्वर पासवान (वय 34), सुरेश प्रल्हाद रणवीर (वय 35), नाकसेन रामदास गजघाटे (वय 52) आणि दीपक जयप्रकाश शर्मा (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एक महिला आरोपी शिवानी पाटील उर्फ जोया रेहान खान फरार आहे.
रविकांत बालेश्वर पासवान (वय 34), सुरेश प्रल्हाद रणवीर (वय 35), नाकसेन रामदास गजघाटे (वय 52) आणि दीपक जयप्रकाश शर्मा (वय 36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, एक महिला आरोपी शिवानी पाटील उर्फ जोया रेहान खान फरार आहे. यातील आरोपी रविकांत पासवान हा या सेक्स रॅकेटचा सूत्रधार असून, तो बँक ऑफ बडोदामध्ये असिस्टंट बँक मॅनेजर पदावर काम करतो. दुसरा प्रमुख आरोपी दीपक शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती चतुशृंगी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली. स्वीट सर्व्हिसेस एस्कॉर्ट या वेबसाईटद्वारे हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. यावेळी पोलिसांनी बुकिंगकरिता वापरले जाणारे 11 मोबाईल, 4 लॅपटॉप आणि ग्राहकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारी टाटा सफारी गाडी जप्त केली आहे.