महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील प्रसिद्ध जुना बाजार बंद करण्याचे पोलिसांचे आदेश, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध - shop

पुण्यातील मंगळवार पेठेत मागील कित्येक वर्षांपासून भरणारा जुना बाजार बुधवारी बंद करण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

जुना बाजार

By

Published : Jul 24, 2019, 2:09 PM IST

पुणे- शहरातील मंगळवार पेठेत मागील कित्येक वर्षांपासून भरणारा जुना बाजार बुधवारी बंद करण्यात आला. पुढील महिनाभर तरी हा बाजार भरविता येणार नाही, असे परिपत्रक पोलीस सहआयुक्त राजेंद्र शिसवे यांनी काढले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध जुना बाजार बंद

शहरातील मंगळवार पेठेत रविवार आणि बुधवार या दोन दिवशी शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेसपर्यंत मागील अनेक वर्षांपासून जुना बाजार भरवला जातो. या दोन दिवशी येथील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळेच या रस्त्यावर बुधवारपासून महिनाभर प्रायोगिक तत्वावर हा जुना बाजार भरविता येणार नाही, अशा स्वरुपाचे परिपत्रक पोलीस सहआयुक्तांनी काढले आहे.

जुन्या बाजारात साधारण 500 हून अधिक विक्रेते असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या उदनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला याच ठिकाणी व्यवसाय करु द्या किंवा आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असतात. रविवारी आणि बुधवारी या दोन दिवशी त्या परिसरातून जाताना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका नेहमीच बसतो. या बाबत नागरिकांच्या पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील महिनाभर रस्त्यावर जुना बाजार भरविता येणार नाही.

आज सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कुणालाही या ठिकाणी त्यांची दुकानं लावू दिली जात नाहीत. त्यामुळे या सगळ्या विक्रेत्यांनी या ठिकाणी गर्दी करून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही येथून जाणार नसल्याचे सांगत त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.

ABOUT THE AUTHOR

...view details