पुणे - पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मूळ निवासी असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या २१ वर्षीय मुलाचा चार ते पाच जणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे मंगळवारी (ता. २५) संध्याकाळी साडेदहा ते पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. ( Pune Murder News )
जेलरच्या मुलाचा खून - गिरीधर उत्रेश्वर गायकवाड (वय २१, रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर मांजरी ता. हवेली, मूळ गाव उरळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा खून एका तरुणीसह पाच जणांनी केल्याचे उघडकीस आले आहे. मृत गिरीधर याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणुन काम पाहतात. याप्रकरणी मृताचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड ( वय-२७) यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिली आहे.