महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिंजवडीत पुणे पोलिसाची दारूसाठी दादागिरी;घटना सीसीटीव्हीत कैद - पुणे बातमी

तक्रारदार हॉटेलमध्ये असताना आरोपी पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हा त्याच्या इतर चार मित्रांसह तेथे मध्यरात्री आला. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस, असे म्हणत मारहाण करत त्याने शिवीगाळ आणि दमदाटी केली. हॉटेलच्या बाजूचे चायनीज दुकानाचे लाथ मारून नुकसान केले.

हिंजवडीत पुणे पोलीस कर्मचाऱ्याची दारूसाठी दादागिरी;घटना सीसीटीव्हीत कैद

By

Published : Aug 7, 2019, 6:50 PM IST

पुणे -दारू न दिल्याच्या रागातून पुण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने हिंजवडीमधील हॉटेलमध्ये राडा घातल्याचे समोर आले आहे. हॉटेल मालकाला मारहाण करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी रामकीसन रमेश खैरनार (वय-३२) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिस कर्मचारी अक्षय धुमाळसह अजय खोत व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीत पुणे पोलीस कर्मचाऱ्याची दारूसाठी दादागिरी;घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हॉटेलमध्ये असताना आरोपी पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हा त्याच्या इतर चार मित्रांसह तेथे मध्यरात्री आला. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस, असे म्हणत मारहाण करत त्याने शिवीगाळ आणि दमदाटी केली. हॉटेलच्या बाजुचे चायनीज दुकानाचे लाथ मारून नुकसान केले. यात दुकानांच्या काचा फुटल्या असून नुकसान झाले आहे. घटनेप्रकरणी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.. मात्र, एका अशा पोलीस कर्मचाऱ्यामुळे सर्व पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती.

ABOUT THE AUTHOR

...view details