महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Police Lathicharge : विविध मागण्यांसाठी पुण्यातील कात्रज चौकामध्ये उपोषण; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - कात्रज चौकात रमेश बाबर उपोषण

कात्रज परिसरातील अनेक समस्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबर (Ramesh Babar Protest in katraj) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. आज आंदोलनकर्ते पाण्याच्या टाकीजवळ म्हणजेच पंपिंग स्टेशन येथे जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची (Police Lathicharge on protesters in katraj) झाली.

Police Lathicharge
आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

By

Published : Apr 19, 2022, 3:02 PM IST

Updated : Apr 19, 2022, 3:14 PM IST

पुणे -कात्रज परिसरातील अनेक समस्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबर (Ramesh Babar Protest in katraj) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. आज आंदोलनकर्ते पाण्याच्या टाकीजवळ म्हणजेच पंपिंग स्टेशन येथे जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज (Police Lathicharge on protesters in katraj) केल्याची घटना घडली आहे.

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

कात्रजमधील विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - कात्रजमधील अनेक समस्यांना सामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कात्रजकडे पाठ फिरवलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे उपोषण करत असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे. कर भरूनही कात्रज परिसरात सुविधांचा मोठा अभाव आहे. पाण्याच्या मोठ्या समस्येला कात्रजकरांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात पाण्याच्या आठ टाक्या असूनही पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा नाही. त्यांचा विकास कसा करणार? याशिवाय कात्रज चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. जोपर्यंत कात्रजमधील नागरिकांच्या समस्या दूर होत नाहीत तो पर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे.

Last Updated : Apr 19, 2022, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details