महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जनता कर्फ्यूनंतर पुण्यात संचारबंदी, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'पोलीस मैदानात'

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यात जनता कर्फ्यूनंतर संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीत नागरिकांना बाहेर फिरता येणार नसल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.

Joint Cp
अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

By

Published : Mar 23, 2020, 10:37 AM IST

पुणे - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पुण्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुणे शहरात रात्री नऊ वाजतापासून सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात प्रथमच संचारबंदी लागू केल्याची घोषणा अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे


या काळात कोणालाही रस्त्यावर चालणे, फिरणे, वाहतूक संचार आणि उभे राहता येणार नाही. कोणत्याही एकट्या व्यक्तीला चालता, फिरता येणार नाही‌. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वांना हा कर्फ्यू लागू आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. व्यक्तींना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्याचा त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शहरात माहिती देऊन जनजागृती केली जाणार असल्याचेही शिसवे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details