वर्दीतील दर्दी! व्यग्र वेळापत्रकातून पोलिसाने जपला गायनाचा छंद - News about Vitthal Ghorpade
नोकरी करताना पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळत नाही. तरी ही यातून वेळ काढत पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घोरपडे यांनी गाण्याचा छंद जोपासला आहे. त्यानी गायलेले एक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पुणे - नोकरी करताना वेळेचे बंधन नाही, कधी बारा तास तर कधी अठरा तास ड्युटी, सण उत्सवात सुट्टी नाही. हे वर्णन आहे एका पोलीस कर्मचाऱ्यांचे. मात्र, अशा व्यस्त वेळापत्रकातूनही आपला छंद जोपासता येतो हे पोलीस कॉन्स्टेबल सागर उर्फ विठ्ठल घोरपडे यांनी दाखवून दिले आहे. सागर घोरपडे यांनी गायलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी गायलेल्या एका गाण्याला सात दिवसात लाखो लोकांनी पाहिले, त्यावर प्रतिक्रिया दिल्या आणि मोठ्या संख्येने हे गाणे शेअर देखील झाले आहे. पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या सागर घोरपडे यांना आम्ही शोधून काढले आहे, खास ई टीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी.