नूतन वर्ष हे अपघातमुक्त व्हावे; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभेच्छा - Pimpri Chinchwad City Police
आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा पत्रात देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहन चालकांना केले. नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या.
पुणे- नववर्षाच्या स्वागताला पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रस्त्यावर येऊन वाहनचालकांना वाहतूक शुभेच्छा पत्र दिले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहन चालकांना त्यांनी केले आहे. तसेच नूतन वर्ष हे अपघातमुक्त व्हावे अशा शुभेच्छा वाहनचालकांना दिल्या आहेत.
नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे...
रस्ता सुरक्षेबाबत वाहनचालकांना वाहतूक शुभेच्छापत्र देण्याबरोबच आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा पत्रात देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहन चालकांना केले. नूतन वर्ष हे अपघात मुक्त व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. वाहतूक शुभेच्छा पत्रामध्ये वाहन चालकांसाठी प्रतिज्ञा आणि वाहतुकीचे आदर्श नियम नमूद करण्यात आले आहेत.