महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

pune illegal liquor seller arrest : पुष्पा स्टाईल ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक - pune two arrest

पुष्पा चित्रपटासारखे ( Pushpa Movie ) ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक ( Illegal transport of foreign liquor ) करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली ( Two Arrested By Excise Department ) आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे - बंगळुरू महामार्गावरील वळवण येथे केलेल्या कारवाईत एकूण ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

crime
crime

By

Published : Jul 8, 2022, 3:36 PM IST

पुणे - चित्रपटाच्या धर्तीवर ट्रकमधून अवैधरित्या दारू वाहतूक ( Illegal transport of foreign liquor ) करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाने गजाआड ( Two Arrested By Excise Department ) केले. ट्रकचालक बाबुलाल गेवरचंद मेवाडा (५२), क्लिनर संपतलाल भवरलाल मेवाडा (३०, दोघे. रा, भिलवाडा, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्याचा हा प्रकार पाहून पोलिसांनाही पुष्पा चित्रपटाची आठवण झाली. आरोपींनी ट्रकच्या पुढील भागात दारूसाठा आणि पाठीमागील बाजूस पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅस्टिक पाईप ठेवले होते. मात्र, पोलीस तपासणीत पुष्पा स्टाईल चोरीचा ( ( Pushpa Movie ) हा बनाव उघड झाला आहे.

पुण्यात विदेशी दारूची अवैध विक्री करणारे दोघे गजाआड

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली दारू - गोवानिर्मित असलेली ही दारू महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत आहे. ट्रकमधून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रॉयल चॅलेंज प्रिमीयमच्या ७५० मिली क्षमतेच्या ४८ बॉक्स, व्हिस्कीचे ४४७ बॉक्स, टुबर्ग ४२ बॉक्स असे जवळपास पाच हजारांहून अधिक बाटल्या आणि इतर मुद्देमाल असा ५९ लाख ९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकची तपासणी केली तेव्हा पाठीमागील बाजूला प्लॅस्टिकचे पाईप आढळून आले. मात्र, तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कंपार्टमेंट केल्याची शंका पथकाला आली. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकची चारही बाजूने झाडाझडती घेतली असता आरोपींनी ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट केल्याचे दिसून आले. पाठीमागील बाजूला पाईप आणि पुढील कंपार्टमेंटमध्ये विदेशी दारूचा साठा ठेवण्यात आला होता.

हेही वाचा -Uddhav Thackeray Led Faction : शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा झटका, शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देणारी याचिका तातडीने घेण्यास नकार

ABOUT THE AUTHOR

...view details