पीएमपीएमएलकडे इंधन, वेतनासाठीही नाहीत पैसे.. दोन्ही महापालिकांकडे तब्बल 183 कोटींची थकबाकी
पुणेकरांची लाईफलाइन म्हणून या पीएमपीएमएल बसकडे पाहिलं जातं. कोरोनाच्या संकटात बंद पडलेली वाहतूक सेवेमुळे पीएमपीएमएलचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता तर इंधन व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नसल्याचे सांगितले जात आहे.
पीएमपीएमएल बससेवा
पुणे - पुण्याची लाईफलाइन म्हणून पीएमपीएमएल बससेवेला ओळखलं जातं. आधीच लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कंबरड मोडलं असताना आता प्रवाशांअभावी तोट्यात सुरु असलेली पीएमपीएमएल पैशाअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे.
कुठलीही थकबाकी नाही - महापौर
पुणे महानगरपालिकेने मात्र पीएमपीएमएलची कुठलीही थकबाकी नसल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षीची संचलन तूट ही पालिकेने आधीच दिलेली आहे. या वर्षीची संचालन तूट पुढच्या वर्षी दिली जाते, असं सांगत राज्य सरकारने आता पीएमपीएमएलला आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचं सांगत महापौरानी आपली जबाबदारी झटकली आहे.