महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएमएल बस हॉटेलमध्ये घुसली; लाखोंचे नुकसान - अपघात

बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने बस थांबवताना हा प्रकार घडला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमपीएमएल बस अपघात

By

Published : May 17, 2019, 5:37 PM IST

पुणे - शहरातील वडगाव बुद्रुक येथील हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसल्याची घटना घडली आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने बस थांबवताना हा प्रकार घडला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पीएमपीएमएल बस अपघात


सिंहगड कॉलेजकडून स्वारगेटकडे बस (एमएच-१२ एफसी-९४३५) जात होती. कॉलेजच्या उतारावरुन खाली जात असताना बसचा ब्रेक निकामी झाला असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी बसमध्ये चालक, वाहक आणि इतर २ ते ३ प्रवासी होते. चालकाने बस थांबवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकवली. परंतु, बस वेगात असल्याने कठड्याला धडकून सिंहगड फाउंटेनमध्ये हॉटेलमध्ये घुसली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातात हॉटेल सिंहगड फाऊंटेनचे साधारण २ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, अशी तक्रार हॉटेल मालकाने दिली आहे. याआधीही पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक निकामी होवून अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नादुरुस्त बस रस्त्यावर कशा धावतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details