पुणे - पुणे महापालिकेने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली आहे. आम्ही राज्य सरकार व केंद्र सरकारकडून परवानगी घेणार आहोत. मात्र, आम्हाला २५ लाख लशीच्या डोसची गरज असल्याचे पुणे महापालिकेचे महापौर मुरलधीर मोहोळ यांनी सांगितले.
पुणे महापालिकेचे महापौर मुरलधीर मोहोळ म्हणाले, की लस उपलब्ध नसल्याने पुणे महापालिका योग्यपणे नियोजन करू शकत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने स्वत:हून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत सीरमबरोबर चर्चा सुरू असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा-बिहारमधील गंगेनंतर मध्य प्रदेशमधील रुंझ नदीतही आढळले सहा मृतदेह
लसीकरणात पुण्यातील नागरिकांची गैरसोय
१८ ते ४४ वयोगट आणि ४५ वर्षांहून अधिक वयोगटाच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ही लसीकरण प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, गेली काही दिवस लसीकरणाची प्रक्रिया खंडित झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला योग्य नियोजन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. लस सतत वेळेवर मिळेपर्यंत परिस्थिती तशीच राहिन, असेही महापौरांनी यावेळी म्हणाले.
हेही वाचा-भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज
पुण्यात ९ लाख जणांचे लसीकरण पूर्ण
पुण्यातील ९ लाख नागरिकांना लशींचे डोस देण्यात आलेले आहेत. त्यापैकी १ लाख नागरिकांना लशीचा दुसरा डोस मिळालेला आहे. नागरिकांना लवकरात लवकर लस मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.