पुणे -पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील जीर्ण जुन्या इमारती व वाडे यांचा बिकट प्रश्न समोर आल आहे. मुंबईमध्ये इमारत पडण्याच्या घटनेनंतर या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पुण्याचा विचार केला तर पेठांमध्ये असलेले जुने वाडे अधिक धोकादायक आहेत.
महापालिकेने पुणे शहरात असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. अशा इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटीस पाठविल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी महापालिकेने ही कारवाई सुरू केली. महापालिकेने अशा 159 इमारतींना नोटीस पाठविली आहे.
हेही वाचा-Corona Deaths : काल सर्वाधिक 6 हजार 148 लोकांचा मृत्यू, अजूनही दुसरी लाट ओसरली नसल्याचा पुरावा
4 इमारती पाडल्या -
शहरात पूर्णपणे मोडकळीस आलेले 4 वाडे पाडण्यात आले आहेत. तर इतर धोकादायक इमारती खाली करून त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे धोकादायक इमारती या तीन गटांमध्ये विभागण्यात येतात. यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ त्या इमारती पाडणे या पहिल्या वर्गवारीत यावर्षी शहरात 4 इमारती होत्या.