महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PM Modi Maharashtra Visit Live Updates : राजभवनातील क्रांतीगाधा गॅलरीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती - पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा

PM Modi live
PM Modi live

By

Published : Jun 14, 2022, 6:26 AM IST

Updated : Jun 14, 2022, 5:28 PM IST

17:27 June 14

राजभवनातील क्रांतीगाधा गॅलरीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

राजभवनातील क्रांतीगाधा गॅलरीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

17:18 June 14

एकाच विमानाने पंतप्रधान मोदी, फडणवीस अन् अजित पवार मुंबईला रवाना

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकतेच देहू येथील संत तुकाराम महाराज मुर्तीं आणि शिळा मंदिराचा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईला कार्यक्रमासाठी हेलीकॉप्टरने गेले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वेगळं हेलिकॉप्टर होते. मात्र, या तीन नेत्यांनाही मोदी एकाच हेलिकॉप्टरमध्ये मुंबईला घेऊन गेले आहेत.

16:23 June 14

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार - पंतप्रधान

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Dehu Visit ) आज ( मंगळवारी ) देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ( Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg ) 4 टप्पात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ( Sant Tukaram Maharaj Palkhi Marg ) काम 3 टप्प्यात पूर्ण होणार, अशी घोषणा केली आहे.

15:17 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण

संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण

14:20 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण.

14:01 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूत आगमन, तुकाराम महाराजांच्या मंदिराचे करणार लोकार्पण

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत दाखल झाले आहे. त्यांच्या हस्ते देहू येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे

13:19 June 14

उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे केले स्वागत

अजित पवारांनी मोदींचे केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावर दाखल.

13:12 June 14

पंतप्रधान मोदींचे पुण्यात आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात आगमन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

13:11 June 14

राष्ट्रवादी इज इक्वल टू राजकारण

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जी कमान लावण्यात आली होती त्यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केल आहे. त्या म्हणाले की, राष्ट्रवादी इज इक्वल टू राजकारण..याच्या पलीकडे फार काही बोलण्याची गरज नाही. कोणाचे फ्लक्स लागले नाही लागले याच्याने काहीही फरक पडत नाही. जनतेच्या मनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छवी कोणीही काढू शकत नाही. फोटो लहान मोठे याने काहीही फरक पडत नाही, असे देखील यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.

13:03 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारकऱ्यांना 'या' अपेक्षा

प्रतिक्रिया देताना वारकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वारकरी भागवत पताका स्तंभाचे पूजनही होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील लोकार्पणसोहळ्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा मंडपात वारकऱ्यांना संबोधित करणार आहे. मोठ्या संख्येने सभा मंडपात वारकरी हे दाखल झाले असून, अनेक वारकऱ्यांनी आजचा दिवस हा आमच्यासाठी दिवाळी सारखा असल्याचे सांगितले आहे. तर काही वारकऱ्यांनी पंतप्रधानांकडून या अपेक्षाही व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहे. यावेळी पंतप्रधानांना ऐकण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंद्रायणी नदी काठ संवर्धन, तसेच वारी बाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

12:00 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वारकरी भागवत पताका स्तंभाचे पूजन

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये वारकरी भागवत पताका स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर 10 बाय 15 फूट वारकरी ध्वज असणार आहे. त्याचे ध्वजारोहण व पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.

11:18 June 14

देहूत पोलिसांचा चोख बंदोबस्त, तीन किलोमिटर पर्यंत बॅरिकेट्स

पुणे -काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे सभा मंडपातून वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत. सभास्थळी 30 - 40 हजार नागरिक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन किलोमिटर पर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

10:34 June 14

आकर्षक फुलांनी सजले तुकाराम महाराजांचे मंदिर

तुकाराम महाराज मंदिरातील दृश्य

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या आतमध्ये देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिळा मंदिरातील सजावट पाहूया.

08:40 June 14

मंदिर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी

तयारी बाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने तयारीचा आढावा घेतला.

08:36 June 14

डॉग स्कॉडही जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासमोर नतमस्तक

मंदिरासमोर नतमस्तक होताना श्वान

पुणे -जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. देहूतील मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्य मंदिराला सजावट करण्यात आली असून पालखी रथ प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आला आहे, त्याला देखील फुलांची आरास करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने डॉग स्कॉडकडून मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी डॉग स्कॉड देखील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात नतमस्तक झालेले पाहायला मिळाले.

08:15 June 14

मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह विधान

बोलताना काँग्रेस नेते शेख हुसेन

नागपूर - काल काँग्रेसच्या वतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मंचावर उपस्थित असताना मोदी सरकार विरोधात भाषणे दिलीत. पण याच दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह बोलून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की... असे ते बोलून गेलेत. या विधनासाठी एखादा नोटीसही येईल, पण याची मला काही परवा नाही, असेही शेख हुसेन यावेळी आक्रमक भाषन देण्याच्या ओघात बोलून गेलेत.

08:11 June 14

'असा' असेल पुणे दौरा

पंतप्रधान मोदी दुपारी 1.45 च्या सुमारास देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करतील. त्यानंतर सायंकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं लोकार्पण करतील. संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

06:14 June 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूत आगमन

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ( PM Modi dehu pune visit news ) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार ( PM Modi To Visit Maharashtra ) आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार ( PM Narendra Modi Dehu Visit ) आहे.

Last Updated : Jun 14, 2022, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details