महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress Protest Against Girish Bapat : गिरीष बापटांच्या घराबाहेर काँग्रेसचे 'माफी मांगो' आंदोलन - congress protest pune marathi news

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने राज्यभरात भाजपा नेत्यांच्या घराबाहेर 'माफी मांगो' आंदोलन केले आहे. आज खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर काँग्रेसने माफी मांगो ( Pune Congress Protest Against Girish Bapat ) आंदोलन केले.

Congress Protest
Congress Protest

By

Published : Feb 18, 2022, 4:04 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने देशात कोरोना पसरवला, असे वक्तव्य केले ( PM Modi Corona Spread Speech ) होते. त्यानिषेधार्थ तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर 'माफी मागो' आंदोलन करण्यात आले ( Pune Congress Protest Against Girish Bapat ) आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, संसदेत सत्य बोलायचं असते. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने या देशाच्या जनतेशी खोट बोलण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संसदेत खोटं बोललं आहे. त्याचा निषेध आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी जाहीर माफी मागावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया

राज्यभर आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला बदनाम करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलं आहे. राज्यातील भाजपाच्या खासदारांच्या घरा बाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले.

हेही वाचा -Sanjay Raut Allegation Kirit Somaiya : 'एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चाललाय,' राऊतांची सोमैयावर घणाघाती टीका

ABOUT THE AUTHOR

...view details