पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती.
PM Modi Pune Visit : नद्यांचे महत्त्व, प्रदूषण समजून घेण्यासाठी एक दिवस नदी उत्सव साजरा करा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
14:08 March 06
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती
13:17 March 06
प्रत्येकांनी मेट्रोतून प्रवास करावा
2014 पर्यंत दिल्ली एनसीआर मध्येच मेट्रो होती. आज देशातील दोन डझनहून अधिक शहरांत मेट्रो सुरू होत आहे. यात महाराष्ट्रातील हिस्सा अधिक आहे. राज्यात मेट्रोचा विस्तार होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शहर सर्वच क्षेत्रात अग्रेसर व्हावं यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. रेरा कायदा मध्यवर्गीयांसाठी फायदेशीर ठरत आहे.
13:17 March 06
नदी उत्सव साजरा करावा
नद्यांचे महत्व, होणारे प्रदुषण समजून घेण्यासाठी वर्षातून एक दिवस ठरवून नदी उत्सव साजरा करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. प्रत्येक नागरिकांनी वर्षातून एक दिवस नदी आणि पाण्याविषयी आपुलकी दाखवावी
13:17 March 06
इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार
पुणे परिसरात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य लाभेल. तसेच प्रदुषण देखील कमी होईल.
13:15 March 06
दोन डझनहून अधिक शहरांत मेट्रो सुरू
2014 पर्यंत दिल्ली एनसीआर मध्येच मेट्रो होती. आज देशातील दोन डझनहून अधिक शहरांत मेट्रो सुरू होत आहे. यात महाराष्ट्रातील हिस्सा अधिक आहे. राज्यात मेट्रोचा विस्तार होत आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक शहर सर्वच क्षेत्रात अग्रेसर व्हावं यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. रेरा कायदा मध्यवर्गीयांसाठी फायदेशीर ठरत आहे.
12:56 March 06
पंतप्रधानांच्या भाषणाची मराठीतून सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांना अभिवादन करत भाषणाची सुरूवात केली. तसेच बाबासाहेब पुरंदरेंची सुद्धा यावेळी आठवण काढली.
12:42 March 06
महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून बेताल वक्तव्य
भाषणात अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, राज्यातील काही महत्वाच्या पदावरील व्यक्तींच्या वक्तव्यांमुळे महापुरूषांचा अपमान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंविषयी असमर्थनीय वक्तव्य केल्या जात आहे. शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत आहे, असे म्हणत एकप्रकारे राज्यपाल्यांची मोदींकडे त्यांनी तक्रार केली आहे.
12:39 March 06
इतरही प्रकल्पांना वेग द्यावा -अजित पवार
नागपूर मेट्रोप्रमाणेच राज्यातील इतरही मेट्रो प्रकल्पाला वेग देऊन नागरिकांच्या सेवेत आणावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना केली आहे. विकास कामात कोणतेही राजकारण आणणार नाही. पुणे मेट्रो पूर्णत्वास येण्यास तब्बल 12 वर्षे लागली. पुणेकरांना खूप त्रास सहन करावा लागला असल्याचेही ते म्हणाले.
12:28 March 06
ऑनलाइन तिकीट काढून मोदींनी केला प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोबाईलवर ऑनलाइन तिकीट काढून प्रवास केला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणातील सभेत ते बोलत आहे.
12:08 March 06
पंतप्रधान मोदी एमआयटी महाविद्यालयात दाखल
पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदी एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले आहे. त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. प्रांगणात मोदी संबोधन करणार आहे. तसेच महापालिकेच्या काही योजनांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत. समर्थकांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरच्या अंबाबाई मातेची प्रतिकृती देऊन त्यांचे स्वागत केले. लेखक आर. के लक्ष्मण यांची कन्या उषा लक्ष्मण यांनी देखील पंतप्रधानांना पुस्तक भेट दिले.
11:54 March 06
एमआयटी महाविद्यालयाकडे रवाना
पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदींचा ताफा एमआयटी महाविद्यालयाकडे रवाना झाला आहे. एमआयटी महाविद्यालयात पंतप्रधानांची सभा होणार आहे. महाविद्यालय प्रांगणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहेत. काळे शर्ट, मोजे, मास्क आणि रूमाल आणण्यास बंदी आहे.
11:47 March 06
मेट्रोतून प्रवास
मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. गरवारे स्टेशन पासून ते आनंदनगर पर्यंत ते प्रवास करत आहे. मेट्रो कोचमध्ये काही गतिमंद विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी ते संवाद साधताहेत
11:36 March 06
मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. गरवारे स्थानकावर हे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रकल्पाची ब्रिजेश दीक्षित यांनी माहिती दिली. कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, महापौर यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहे. दुपारी तीन वाजतापासून प्रवाशांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध केली जाईल.
11:30 March 06
गरवारे स्थानकाकडे रवाना
मनपा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावर केल्यानंतर ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. ते गरवारे स्थानकाकडे रवाना झाले आहे. पंतप्रधान मोदी हे गरवारे स्थानक ते आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रोचा प्रवास देखील करणार आहे.
11:25 March 06
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
पुणे महानगरपालिकेच्या आवारातील महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांनी केले. यावेळी पंतप्रधानांना महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले. पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आटोपवून ते पुढील कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहे.
11:15 March 06
महापालिकेत पंतप्रधान पोहोचले
विमानतळाहून पंतप्रधानांचा ताफा महानगर परिसरात पोहोचला आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ उपस्थित आहे.
11:05 March 06
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात आगमन झालं आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर शासनाच्या वतीने मंत्री सुभाष देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. ते थोड्याच वेळात महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.
10:59 March 06
राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन
पुणे - २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे. दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मूक आंदोलन ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शांततेच्या मार्गाने काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी व महापुरुषांची भजने गात मूक आंदोलन करण्यात येत आहे.
10:35 March 06
फेट्यावरून वाद
एमआयटी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या राजबिंडा शाही फेटा घालण्यात येणार आहे. या फेट्यावर राजमुद्रा देखील लावण्यात आली होती. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि शिवप्रेमींनी विरोध केल्यामुळे फेट्यामधील राजमुद्रा काढण्यात आली आहे. आता राजमुद्रा नसलेला फेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात येणार आहे.
10:21 March 06
काँग्रेसकडून मोदींविरोधात घोषणाबाजी
पंतप्रधानांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ 'गो बॅक मोदी' अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
09:34 March 06
पंतप्रधान आज पुण्यात
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचे उद्घाटन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच अनेक विकासकामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आज नरेंद्र मोदी जवळपास 5 तास पुण्यात असणार आहेत. त्याच अनुषंगाने प्रशासन देखील जोरदार तयारीला लागलेल पाहायला मिळत आहे.
सकाळी सुमारे साडे दहाच्या सुमारास मोदी पुण्यात येणार आहेत. त्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ते करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या दौऱ्यातला मुख्य कार्यक्रम म्हणजे पुणे मेट्रोच अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. मोदी स्वतः मेट्रोने प्रवास करत आनंदनगर पर्यंत जाणार आहेत.