महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'प्लास्टिक टोमॅटो' रोगामुळे शेतकरी हैराण - कृषी अधिकाऱ्यांकडून रोगग्रस्त बागांची पाहणी

टोमॅटोचे हब अशी ओळख असलेल्या आणि उन्हाळी हंगामात उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरात यंदा टोमॅटो पिकावर प्रथमच अनेक प्रकारचे व्हायरस आढळल्याने उत्पादक धास्तावले आहे.

'प्लास्टिक टोमॅटो' रोगामुळे शेतकरी हैराण
'प्लास्टिक टोमॅटो' रोगामुळे शेतकरी हैराण

By

Published : Jun 2, 2021, 10:00 PM IST

पुणे -टोमॅटोचे हब अशी ओळख असलेल्या आणि उन्हाळी हंगामात उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव परिसरात यंदा टोमॅटो पिकावर प्रथमच अनेक प्रकारचे व्हायरस आढळल्याने उत्पादक धास्तावले आहे. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

'प्लास्टिक टोमॅटो' रोगामुळे शेतकरी हैराण

शेतकऱ्यांना लाखोंचा तोटा

जुन्नर तालुक्यत टोमॅटो तोडणी सुरू झाली आणि संपूर्ण पिकावरच विविध विषाणूजन्य आजार आल्याने फळे लाल होण्याऐवजी जागेवरच पिवळ्या कलरची होऊन खराब होऊ लागली आहे. फळाला आतून गर नसल्याने वजन नाही. फळाला वजन नसल्याने शेतकरी या आजाराला 'प्लॅस्टिक टोमॅटो' म्हणत आहेत. वरून पिवळा कलर, आतमध्ये काळी-पांढरी बुरशी यात आढळत असल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

कृषी अधिकाऱ्यांकडून रोगग्रस्त बागांची पाहणी

एकट्या जुन्नर तालुक्यात उन्हाळी हंगामात यंदा सुमारे 3 हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड झाली आहे. मात्र मागील 15 दिवसांपासून ठिकठिकाणी या रोगाची लक्षणे आढळल्याने कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत मंगळवारी तालुक्यातील रोगग्रस्त बागांची पाहणी केली. यामध्ये सुमारे 50 टक्के बागांवर या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले असून कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे आणि टोमॅटोमध्ये प्रथमच पाच ते सहा प्रकारचे विषाणू जुन्नर परिसरात आढळल्याचेही सांगितले आहे.

कृषी अधिकाऱ्यांकडून टोमॅटो रोप वाटिकांनाही भेटी

कृषी अधिकारी आणि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनंतर तालुक्यातील टोमॅटो रोप वाटिकांनाही भेटी दिल्या. या ठिकाणीसुद्धा अनेक चुकीच्या गोष्टी आढळल्या. बियाणे, माती, वातावरण, औषधे आदि गोष्टीमुळे किंवा इतर काही कारणाने हे विषाणू टोमॅटोवर आले का आता याबाबत शोध घेतला जात आहे.

'शासनाने लवकरच उपाययोजना कराव्यात'

पिवळा टोमॅटो याला शेतकऱ्यांनी प्लास्टिक टोमॅटो म्हणून संबोधले जरी असले तरी हा रोग टोमॅटो पिकासाठी नवीन नाही. तसेच टोमॅटोवरचा हा रोग दुसऱ्या देशात जसे जर्मनी, इजराइल या देशांमध्ये अशाच प्रकारचा रोग त्या ठिकाणी आला आहे आणि यावरती संशोधन सुरू आहे. पूर्वी व्हायरस पानांवर येत होता व आता बराच काळ लोटल्यानंतर याचेच फर्टिलायझेशन हे फळांवर झाले आहे. यावर शासनाने लवकरच उपाययोजना कराव्यात, असे मत पवार ब्रदर्स कृषी बी बियाणेच्या मालकांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

टोमॅटोवर पडलेल्या या विषाणूजन्य आजारामुळे तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र बाधित होऊन शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. टोमॅटो पिकविणाऱ्यांपैकी सातारा, अहमदनगर आणि पुणे या भागात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा -केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून 'आयुष्यमान भारत'ला ठेंगा; तरतुदीपैकी केवळ ७ टक्के निधी - आरटीआय

ABOUT THE AUTHOR

...view details