पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेश येथे सापळा रचून 12 आरोपींना बेड्या ठोकत 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात केली आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे. यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, असे सांगण्यात आले आहे. मुख्य आरोपी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पिस्तुल घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त -
या प्रकरणी बाबलुसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला यांच्याकडून 8 पिस्तुल आणि 20 जिवंत काडतुसे, कालु उर्फ सुशील मांगीलाल पावरा यांच्याकडून 02 पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुसे, रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील यांच्याकडून 04 पिस्तुल आणि 04 जिवंत काडतुसे, उमेश अरुण रायरीकर यांच्याकडून 2 पिस्तुल, बंटी उर्फ अक्षय राजू शेळके यांच्याकडून 2 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे, धीरज अनिल ढगारे यांच्याकडून 1 पिस्तुल, दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे यांच्याकडून 1 पिस्तुल, माँटी संजय बोथ उर्फ माँटी वाल्मिकी यांच्याकडून 1 पिस्तुल, यश उर्फ बबलू मारुती दिसले 1 पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे, अमित बाळासाहेब दगडे, राहुल गुलाब वाल्हेकर, संदीप आनंता भुंडे यांच्याकडून 2 पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुसे मिळाली आहेत.
मध्यप्रदेशमधून 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई - 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेश येथे सापळा रचून 12 आरोपींना बेड्या ठोकत 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात केली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले पोलीस -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी यातील आरोपी रुपेश सुरेश पाटील याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून 4 पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास करत भोसरी पोलीसांचे एक पथक मध्यप्रदेश येथे गेले. तेथील, उर्मटी गाव मध्यप्रदेश येथील एका जंगलातून पिस्तुल विक्री करणारा मुख्य डीलर रॉनी उर्फ बाबलुसिंग अत्तारसिंग बरनाला यास अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचा साथीदार कालु उर्फ सुशील मांगीलाल पावरा याला ताब्यात घेण्यात आले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून साधायचे संपर्क -
दरम्यान, मुख्य आरोपी पिस्तुल डीलर रॉनी आणि कालु हे दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून पिस्तुल घेणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करत व संभाषण झाल्यानंतर ते संभाषण डिलीट करत असत. अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, विनोद वीर, संतोष महाडीक, आशिष गोपी यांनी कारवाई केली आहे.