पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात ( ( Industrial City Pimpri Chinchwad ) झटपट श्रीमंत होण्यासाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली, तर अल्पवयीन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 20 लाखांच्या खंडणीसाठी ( Kidnapping for Ransom of Rs 20 Lakh ) 15 वर्षीय ( Kidnapping 15-year-old boy ) सनी कश्यपचे अपहरण करण्यात आलं होते. पाणीपुरीचा गाडा घरी घेऊन जात असताना शस्त्राचा धाक दाखवून सनीचे अपहरण करण्यात आले होते.
आरोपींना अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरी विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचे 20 लाखांचा खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना हिंजवडीत घडली आहे. सनी कश्यप या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हिंजवडी पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणी लक्ष्मण नथुजी डोंगरे, ज्ञानेश्वर सचिन चव्हाण आणि लखन किसन चव्हाण यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.