पुणे- अॅट्रोसिटीची तक्रार करून जेरबंद करण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवडमधील व्यवसायिकाने केला. अरुण पवार असे या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी घराजवळ अनधिकृत खोदकाम केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील पिंपळे गुरव भागात अरुण पवार व्यवसायिक हे वास्तव्यास आहेत. घरात काही लोकांनी प्रवेश करून धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजेंद्र तुपे आणि सुहासिनी तुपे यांची दीड हजार स्केअर फूट जागा आहे. त्यांनी अनाधिकृत बांधकाम केल्याचा दावा अरुण पवार यांनी केला. तसेच ड्रेनेजला जागा सोडलेली नाही, असेही अरुण पवार यांचे म्हणणे आहे. अरुण पवार म्हणाले की, घरी नसताना गेटवर येऊन तुपे यांच्या लोकांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. गुंडाच्या मदतीने ड्रिल मशीन आणून ड्रेज लाईन खोदण्याचा प्रयत्न केला आहे. हा त्रास गेली 2005 पासून नाहक त्रास देत आहेत. महानगरपालिकेचे आणि संबंधित व्यक्तीचे संगनमत असल्याचा संशय आहे. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असा त्यांनी इशारा दिला आहे.
जागेचा वाद: अॅट्रोसिटीची धमकी मिळाल्याचा पिंपरीमधील व्यावसायिकाचा आरोप - Pimpale Gurav crime news
शहरातील पिंपळे गुरव भागात अरुण पवार व्यवसायिक हे वास्तव्यास आहेत. घरात काही लोकांनी प्रवेश करून धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
![जागेचा वाद: अॅट्रोसिटीची धमकी मिळाल्याचा पिंपरीमधील व्यावसायिकाचा आरोप खोदकाम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10301716-1047-10301716-1611066182889.jpg)
तुपे यांनी फेटाळले आरोप-
याप्रकरणी संबंधित तुपे यांच्या नातवाने संबंधित प्रकरणी सर्व आरोप फेटाळले आहेत. खोदकाम केलेली जागा त्यांची आहे, हे सिद्ध करावे. अॅट्रोसिटीची धमकी दिली नसल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पुंज हरी तुपे यांचे नातू शुभम टोनपे म्हणाले की, खोदकाम केलेली जागा ही त्यांच्या मालकीची आहे, हे अरुण पवार यांनी सिद्ध करावे. अॅट्रोसिटीची धमकी दिली नाही. तेच जातीवाचक बोलत आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी जमिनीच्या खाली आमची पाईपलाईन आहे. त्याच्यावर आम्ही खोदले आहे. पत्रकार परिषद या दबाव टाकण्यासाठी आणि गरीब लोकांना त्रास देण्यासाठी घेतल्या जात आहेत. हे सर्व पैशांच्या जोरावर चालले आहे, असा त्यांनी दावा केला.