महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पिंपरी : महिलांच्या तक्रारीसाठी बडी कॉप, महिला कक्ष अन् भरोसा सेल! - पिंपरी पोलीस

देशातील अनेक शहरांमध्ये व्हाट्सअॅपद्वारे महिलांना आपली तक्रार करण्याची सुविधा पोलीस प्रशासनाने उपल्बध करून दिलेली आहे. त्यावरून नोकरदार महिला छेडत असलेल्या व्यक्तीची किंवा रोडरोमिओची तक्रार करू शकतात. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील बडी कॉप चा उपक्रम राबवला जात असून याद्वारे महिलांच्या तक्रारींच निरासन केलं जातं. तर, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी महिलांना भरोसा सेल, महिला कक्ष हा उपक्रम राबवला जात आहे.

-cop-womens-room
महिलांच्या तक्रारीसाठी बडी कॉप, महिला कक्ष

By

Published : Dec 29, 2020, 10:29 PM IST

पुणे - महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा महिला अन्याय सहन करत असतात. अगदी शेवटच्या टोकापर्यंत महिला काही बोलत नाहीत. अशावेळी पीडित महिलांना आधार देण्याची नितांत गरज असते. अशाच पीडित महिला, तरुणी यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात महिला भरोसा सेल, बडी कॉप आणि महिला कक्ष उपक्रम राबवले जात आहेत. महिलांनी अन्याय सहन न करता त्याचा प्रतिकार करायला शिकायला हवं, असे आवाहन महिला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केलं आहे.

महिला भरोसा सेल, महिला कक्ष तरुणी आणि महिलांसाठी तारणहार?

देशातील अनेक शहरांमध्ये व्हाट्सअॅपद्वारे महिलांना आपली तक्रार करण्याची सुविधा पोलीस प्रशासनाने उपल्बध करून दिलेली आहे. त्यावरून नोकरदार महिला छेडत असलेल्या व्यक्तीची किंवा रोडरोमिओची तक्रार करू शकतात. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील बडी कॉप चा उपक्रम राबवला जात असून याद्वारे महिलांच्या तक्रारींच निरासन केलं जातं. तर, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी महिलांना भरोसा सेल, महिला कक्ष हा उपक्रम राबवला जात आहे. यामधून अनेकांच्या संसाराचा गाडा सुरळीत झाला असल्याचं पोलिसांनी सांगितले असून अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याच काम त्यांनी केलं आहे.

बडी कॉप, महिला कक्ष अन् भरोसा सेलविषयी माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त
बडी कॉप म्हणजे काय?बडी कॉप हे मोबाईल धारक महिला, तरुणीसाठी व्हाट्सअॅपद्वारे उपक्रम राबवला जातो. त्यात, केवळ महिला पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या असतात. जेणेकरून महिलांना मन मोकळेपणाने तक्रार मांडता येईल. हा ग्रुप २४ तास अॅक्टिव्ह असतो. तक्रारीची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई अथवा समज दिली जाते. अशा घटनांमध्ये तक्रारदार महिलांच नाव अनेकदा गुपित ठेवलं जातं. दामिनी पथक लवकरच स्थापन करणार -यावेळी महिला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहरात मनुष्यबळ कमी आहे. त्यात गाड्यांची कमतरता आहे. असं असताना ही पिंपरी-ंचिंचवड पोलीस दामिनी पथकाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी हे पथक कार्यरत असणार आहे. यात महिला पेट्रोलिंग स्कॉड असणार आहे. म्हणजे, महिलाच गस्त घालणार आहेत.टिंडर सारख्या अॅपवरून महिलांवर अत्याचार!आयुक्तालयात बडीकॉप, भरोसासेल, महिला कक्ष यासारखे उपक्रम चालू आहेत. फेसबुक आणि व्हाट्सअॅपवरून गुन्ह्यांच प्रमाण वाढलं आहे. टिंडर यासारख्या अॅपवरून महिलांवर अत्याचार होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सायबर सेलच्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली जाणार आहे. महिलांच्या बाबतीत होणाऱ्या घटनांचा तक्रारी सायबरच्या मेल आयडीवर देखील येतात. त्याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात येतो. प्रसंगी समज ही दिली जाते. महिलांनी अन्याय सहन न करता प्रतिकार करावा -पुढे त्या म्हणाल्या, महिला अन्याय सहन करता तेव्हा अन्याय करणाऱ्यांची शक्ती वाढत असते. अशा घटनांमध्ये महिलांनी प्रतिकार करायला शिकायला हवं. महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. मुलीच्या बाबतीत पालकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. बदनामीपोटी पालक पोलिसांपर्यंत येत नाहीत. महिला अत्याचारामध्ये घट येण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं.पिंपरी-चिंचवडमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ -दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, बलात्कार, बाल लौंगिक अत्याचार अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं अधोरेखित झालेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details