पुणे -सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणत प्रि-वेडिंगचा क्रेझ ( Pre Wedding Shoot ) असून अनेक तरुण तरुणी लग्नाच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आठवण म्हणून शूट करत असतात. सध्या हे प्रमाण तरुणांमध्ये वाढतच चालला आहे. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांमध्येही याची ( Senior Citizen Pre Wedding Shoot ) क्रेझ वाढली आहे. आज अनेक ज्येष्ठ नागरिक हे पोस्ट मॅरेज शूटिंग करत आहेत. पुण्यातील गुरुवार पेठ येथे राहणारे सुभाष थोरवे आणि अल्का थोरवे या दोन्ही ज्येष्ठ जोडप्याने असच पोस्ट मॅरेज शूटिंग केलं आहे. या जोडप्याने फक्त भारतातील नव्हे, तर भारताबाहेर ही जाऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन या जोडप्याने शूटिंग केली आहे.
भारताबाहेर जाऊन केलं शूट -आज तरुण तरुणींमध्ये विविध रिल्स, शूटिंग, तसेच लग्नाआधी त्यानंतर गरोदरपणात शूट अस वेगवेगळ्या शूटचा क्रेझ हा वाढत चालला आहे. तरुणांचे हे व्हिडिओ बघून आज अनेक सुपरस्टार झालेले आहे. अश्यातच ज्येष्ठ नागरिकांमध्येही याची क्रेझ वाढू लागली आहे. अश्यातच पुण्यातील या जोडप्यानेदेखील विविध ठिकाणी जाऊन शूट, रीलस केलं आहे.