महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rebel MLA Case आमदारांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका, ॲड असीम सरोदे म्हणाले... - शिंदे सरकार

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असताना आणि त्यावर सुनावणी सुरू असताना यामध्ये आता भर पडली आहे. Rebel MLA of Shiv Sena आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून, नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एकूण घ्यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 18, 2022, 6:13 PM IST

Updated : Aug 18, 2022, 6:39 PM IST

पुणे - याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ तारखेला एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, उद्धव ठाकरे इत्यादींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांसह ही याचिका देखील सुनावणीसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबतीत ईटीव्ही भारतने कायदा अभ्यासक असीम सरोदे यांच्याशी सविस्तर संवाद साधला आहे.

ॲड असीम सरोदे ईटीव्ही भातशी बोलताना

जबाबदारी पाळतांना राजकीय नेते दिसत नाहीत यामध्ये, सध्या राज्यात राजकीय मंडळी ही जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्याही पक्षात जातात हे स्थिर प्रशासनाच्या संकल्पनेला धोकादायक आहे. त्यामुळे मतदारांची होणारी फसवणूक व मतदारांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घ्यावे हा या हस्तक्षेप याचिका करण्यामागे उद्देश असल्याचे यावेळी सरोदे यांनी म्हटले आहे. भारतीय लोकशाहीची मुलभूत रचना व मतदारांनी केलेल्या मतदानाचा सन्मान करण्याची जबाबदारी पाळतांना राजकीय नेते दिसत नाहीत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणे व पैशांच्या लोभासाठी राजकीय नेत्यांनी सत्ताकांक्षी बनणे यातून नागरिकांसाठी दुखःद वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -Sentenced To Death, १५ आरोपींना फाशीची शिक्षा, मध्यवर्ती कारागृहात केली होती कैद्याची हत्या

Last Updated : Aug 18, 2022, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details