पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट देऊन एका व्यक्तीला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. लिफ्ट दिल्यानंतर अज्ञात स्थळी नेत, त्याच्याकडून रोख दहा हजार रुपये, डेबिट कार्ड, मोबाईल फोन तसेच धमकावून डेबिट आणि एटीएम कार्डचा गोपनीय पिन देखील घेतला आहे. या प्रकरणी अशोक महादेव खांडीवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्ट दिल्यानंतर एकाला अज्ञात स्थळी नेऊन लुटले हेही वाचा... आता सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण अनोळखी ठिकाणी लिफ्ट घेऊन जातो. मात्र, अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागताना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. लिफ्ट मागणे किती महागात पडू शकते याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. फिर्यादी अशोक यांना सकाळी सव्वा सातच्या सुमारास देहूरोड सेंट्रल चौकातून सुसगावकडे जायचे होते. तेव्हा त्यांनी लिफ्ट मागितल्यानंतर एक पांढऱ्या रंगाची कार थांबली. अशोक कारमध्ये बसले, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना धमकावून त्यांच्याकडील दहा हजार रुपये, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि फोन घेण्यात आला. तसेच कार्डचा गोपनीय पिन देखील घेतला. दरम्यान, अशोक यांचा मोबाईल फोन सिमकार्ड घेऊन त्यांनी परत केला. कारची नंबर प्लेट बनावट आहे, मात्र अज्ञात आरोपी हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
हेही वाचा... लग्नसराईकरता ग्राहकांकडून वाढली मागणी; सोने प्रति तोळा २२५ रुपयांनी महाग
लोकांनी शक्यतो अज्ञात खासगी वाहनाला हात दाखवून थांबवू नये. पिवळी नंबर प्लेट असलेल्या कॅबने शक्यतो प्रवास करावा. तसेच अगोदर खात्री करून नंतरच लिफ्ट मागावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी केले आहे.