पुणे -अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरात मागील दहा दिवसात खुनाच्या सहा घटना घडल्या आहेत. तर मागील काही दिवसात सोनसाखळी चोरीच्या घटनातही वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की काय? असा प्रश्न पडला असतानाच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेतली. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शहराची शांतता भंग करू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांची यादी तयार असून तीन महिन्यात गुन्हेगारी संपवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शहराची शांतता भंग करू देणार नाही - अमिताभ गुप्ता - पुणे पोलीस आयुक्त बातमी
सोमवारी तर पुणे पोलीस आयुक्तालय यापासून हाकेच्या अंतरावर एका बांधकाम व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. यातील खुनाचे पाच गुन्हे उघडकीसही आले आहेत. मात्र, असे असले तरीही वाढती गुन्हेगारी पाहता कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दडपण पोलीस आयुक्तांवर आहे.
मागील काही दिवसात शहरात घडलेल्या खुनाच्या घटना उघडकीस आणल्याची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गुप्ता म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुरुंगातून दोनशेहून अधिक गुन्हेगार पॅरोलवर, जामिनावर बाहेर आले आहेत. या कालावधीत गुन्हेगारी कारवायात वाढत आहे. परंतु असे असले तरीही गुन्हेगारांना आम्ही डोके वर काढू देणार नाही. गुन्हेगारांची यादी तयार केली असून तीन महिन्यात पुण्यातील गुन्हेगारी संपवणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिली.
मागील काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया वाढल्या आहेत. विशेषतः अनलॉक प्रक्रियेनंतर गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. मागील दहा दिवसात पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल सहा खून झाले आहेत. सोमवारी तर पुणे पोलीस आयुक्तालय यापासून हाकेच्या अंतरावर एका बांधकाम व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. यातील खुनाचे पाच गुन्हे उघडकीसही आले आहेत. मात्र, असे असले तरीही वाढती गुन्हेगारी पाहता कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दडपण पोलीस आयुक्तांवर आहे.