पुणे- दोन दिवसाआधी पर्वतीजवळील जनता वसाहतीत पाण्याची 18 इंची पाइपलाइन फुटली. यामुळे परिसरातील सुमारे 40 घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करायला स्थानिक नगरसेवक तसेच प्रशासन आले नाही. तसेच कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांनी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंबिलओढा परिसरात पोस्टर लावले आहे. आंबिलओढा परिसरात एक दिवस राहून दाखवा आणि लाख रुपये जिंका, अशा आशय त्या पोस्टरमध्ये टाकण्यात आला आहे.
'महापौर, आयुक्तांनी आंबिल ओढ्यात एक दिवस राहून दाखवा; लाखोंचे बक्षीस जिंका!'
पाण्याची पाइपलाइन फुटल्याने जनता वाहतीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले होते. यामुळे घरातील सर्व साहित्यांचं नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही येथील स्थानिक नगरसेवक तसेच प्रशासन साधी पाहणी करण्यासाठीदेखील आलेले नाही. त्यामुळे महापौर, स्थानिक नगरसेवक, तसेच आयुक्त यांनी एक दिवस येथे राहावे आणि लाखो रुपयांचे बक्षीस जिंकावे, असे पोस्टर लावण्यात आले आहे.
पाण्याची पाइपलाइन फुटल्याने जनता वाहतीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले होते. यामुळे घरातील सर्व साहित्यांचं नुकसान झाले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य, पाण्यात वाहून गेले. पूर येऊन दोन दिवस झाले. मात्र, अद्यापही येथील स्थानिक नगरसेवक तसेच प्रशासन साधी पाहणी करण्यासाठी देखील आलेले नाही. त्यामुळे महापौर, स्थानिक नगरसेवक, तसेच आयुक्त यांनी एक दिवस येथे राहावे आणि लाखो रुपयांचे बक्षीस जिंकावे असे पोस्टर लावण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून घरात पाणी शिरल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या भागात यावे, पाहणी करावी आणि मदत करावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, शनिवारी रात्री अचानक जलवाहिनी फुटल्याने परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि यात 9 जण जखमी झाले. जखमी लोकांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या पर्वती येथे बांधण्यात आल्या आहेत. त्याला पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होतो. त्या टाक्या आधी भरल्या जातात आणि त्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. डोंगरावरून पाणी येत असल्याने पाण्याला पुरेसा दाब येतो. या दाबामुळे जलोद्रेक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वसाहतीत अनेक गल्ल्या आहेत. या गल्यांमध्ये प्रचंड दाबाने पाणी घुसल्याने अनके घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान गल्ली नंबर 29मधील घरांचे झाले आहे.