पुणे - शहरात वाढत्या कोरोनाचे रुग्ण पाहता मार्च महिन्यापासून स्थानिक प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले आहे. एप्रिल महिन्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यानंतर सकाळी सात ते अकरा या वेळेत सूट देत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. राज्यात पुणे शहरात कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने पुणे पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या पुणेकरांवर कारवाई सुरू केली. मार्च 2020 ते एप्रिल 2021 अखेर साडे चौदा कोटींचा दंड वसुल करण्यात आला. पण इतका दंड वसुल करुनही पुणेकर मात्र ऐकायला तयार नाही. विकेंड लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी पुणेकरांची कारणे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
पुणेकरांची बाहेर फिरण्यासाठी विविध कारणे -
पुण्यात लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. असे असूनही पुणेकर बाहेर फिरत आहे. नविन म्हैस आणायला जायचंय, आईला भेटायला जातोय, मटणाचा डब्बा द्यायचा आहे, सीमकार्ड बदलायचे असून ओटीपी नंबरसाठी माझ्या मित्राला सोबत घेऊन चाललोय, अशी नानाविध कारणे पुणेकर पोलिसांना देत आहे. तसच सोयीचे एक म्हणजे रेमडेसिव्हीर, मेडीकल इमर्जन्सी आहेच. पण पुणे पोलिसही तितकेच चाणक्ष्य असल्याने खरी कारणे माहित करून देतात आणि दंड वसूल करतात.
वाचा लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरण्यासाठी पुणेकरांची कारणे.. जनजागृती करूनही नागरिक विनामास्कच -
पुणे पोलिसांकडून सोशल मीडियासहवर तसे प्रत्यक्षरित्या जनजागृती केली जात आहे. मात्र, तरीही नागरिक विनामास्क बाहेर फिरत आहेत. तसेच पोलिसांशी हुज्जत घालतात. पोलीस निरीक्षक, सह आयुक्त विकेंड लॉकडाऊमध्ये रस्त्यावर उतरून लोकांना मास्कचे महत्व समजावून सांगतात. मात्र, नागरिक काही ऐकत नाहीत.