पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
श्रींचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच
गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये आणि गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुसऱ्या वर्षी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रींच्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केले. दगडूशेठच्या श्रींचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार येईल.
घरबसल्या पाहा दगडूशेठ हलवाई 'श्रीं' चा विसर्जन सोहळा - ganeshotsav 2021
गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये आणि गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुसऱ्या वर्षी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रींच्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केले.
पितळ्याच्या कुंडामध्ये श्रींच्या मूर्तीचे विसर्जन
रविवारी सायंकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळ्याच्या कुंडामध्ये श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, निर्विघ्न या... अशी प्रार्थना श्रीं ची चरणी यावेळी करण्यात येईल.
आॅनलाईन पध्दतीने श्रीं चा विसर्जन सोहळा
समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा -बीड : दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या; विहिरीत उडी घेत संपवले जीवन