महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन; राज्यपाल कोश्यारींची उपस्थिती - पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

Pedals Cycle Rally on occasion of PM Modis birthday
Pedals Cycle Rally on occasion of PM Modis birthday

By

Published : Sep 17, 2021, 9:07 AM IST

पुणे - आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

'सायकलचा दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे' -

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो, असे देखील यावेळी कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते ट्रायथलेट कौस्तुभ राडकर, सायकलपटू सुनीता नाडगीर, एकादशी कोल्हटकर, निरुपमा भावे, जुगल राठी, ट्रायथलेट आणि ट्रेकर निलेश मिसाळ, योग प्रशिक्षक आरती चव्हाण, आयर्नमॅन मेघ ठकार आणि आयोजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे हे सायकलिंचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आयोजक मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा -चंद्रकांत पाटील यांना भविष्य कळत असेल म्हणून ते तसे बोलले असतील - अशोक चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details