महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दार उघडा, देवाचे दार उघडा, पुण्यातील मंदिरे उघडण्यासाठी 'पतित पावन'चे आंदोलन - पुणे सारस बाग खंडोबा मंदिर बातमी

नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली राज्यातील सर्व मंदिरे उघडावी. या मागणीसाठी पुण्यातील सारस बागेतील खंडोबा मंदिर येथे पतित पावन संघटनेने भंडारा उधळून आंदोलन केले.

patit pavan sanghatana agitation for opneing temple in pune
दार उघडा, देवाचे दार उघडा

By

Published : Sep 13, 2020, 5:56 PM IST

Updated : Sep 13, 2020, 6:12 PM IST

पुणे - महाराष्ट्र सरकारने दारूची दुकाने उघडली, तर मंदिरे उघडायला काय अडचण?...दार उघडा दार उघडा, देवाचे दार उघडा... मंदिरे बंद ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणा देत भंडारा उधळून सारसबाग येथील खंडोबा मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावी, याकरता कार्यकर्त्यांनी खंडोबाची आरती देखील केली.

दार उघडा, देवाचे दार उघडा, पुण्यातील मंदिरे उघडण्यासाठी 'पतित पावन'चे आंदोलन

श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान व पतित पावन संघटनेतर्फे सारसबाग येथील खंडोबा मंदिर येथे मंदिरे नागरिकांसाठी खुली करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्निल नाईक, गौरव घोडे, आशिष पालकर, सचिन कचरे, अविनाश पवार, पदम तिकोने, ॠतिक वाघमारे, आकाश महागडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन व मंदिर उघडून आरती देखील करण्यात आली.

दार उघडा, देवाचे दार उघडा

यावेळी गौरव घोडे म्हणाले, की नागरिकांचे नैराश्य दूर होऊन सद्यपरिस्थिती पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व मंदिरे त्वरीत खुली करावी. मंदिरे उघडली तर हळद कुंकू, फुले, नारळ व प्रसाद विक्री करणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागेल. कोरोनाच्या काळात या लोकांचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्र सरकारने त्यांनी आर्थिक मदतही करावी, असेही त्यांनी सांगितले.

दार उघडा, देवाचे दार उघडा
महाराष्ट्रात दारूची दुकाने, लॉज-हॉटेल यांसह इतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र, हातावर पोट असलेल्या मंदिराबाहेरील विक्रेत्यांसाठी कोणतीही मदत देखील आलेली नाही. सरकारने त्वरीत मंदिरे न उघडल्यास पतित पावन संघटना मोठया प्रमाणात जनआंदोलन करुन मंदिरे उघडेल, असा इशारा पतित पावन संघटनेचे संपर्क प्रमुख स्वप्नील नाईक यांनी यावेळी दिला.
Last Updated : Sep 13, 2020, 6:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details