पुणे - माझी आणि दादांची राजकारणाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये राजकारणातून संन्यास घेण्याबद्दल बोलणे झाले नसल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ईडी प्रकरण आणि अजित पवारांचा राजीनामा या पार्श्वभूमीवर शरद पवारांची पत्रकार परिषद आज पुण्यामध्ये पार पडली. यावेळी बोलताना, महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्यात माझे नाव आल्याने अजित पवार अस्वस्थ होते. अलीकडे राजकारणाची पातळी घसरली आहे, असे म्हणत राजकारणातून बाहेर पडण्याच्या विचारात अजित पवारांनी राजीनामा दिला असल्याचे मला त्यांच्या चिरंजीवांकडून समजले, अशी माहिती शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत दिली होती.