पुणे जगभरातील विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्यांच्या त्यांच्या रीतिरिवाज नुसार साजरा केले जाते. इंग्रजी नवीन वर्ष जरी 1जानेवारीला सुरू होत असले तरी विविध धर्मियांचे नवीन वर्ष हे त्या त्या धर्मानुसार साजरे केले जाते. 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची Parsi New Years सुरुवात होत आहे. जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस पारशी लोक Parsi people साजरे करतात पारशी वर्षाचा शेवटचा दिवस आणि नूतन वर्षाचा आधीचा दिवस पतेती Pateti Festival असते तर पारशी वर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ Navroz म्हणून ओळखला जातो.
प्रार्थना तसेच वेगळे वेगळे नाटक खेळ विविध साजरे केले जातातपुण्यातील सर जमशेटजी जेजीभाई अग्यायरीचे हाय प्रेस्ती कईपेशन यांनी सांगितले की पारशी समाज हा अग्निपूजक आहे आणि यासाठीच समाजाचे मंदिर म्हणजेच अग्यारी येथे अग्नीची पूजा केली जाते. पारशी नव वर्ष हे ऑगस्टमध्ये सुरू होते. यामध्ये आधीच्या वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आपल्या झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी पारशी लोकांच्या मध्ये महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये त्यातील दहाव्या शेवटच्या दिवशी अनेक पारशी नागरिक आपल्या जवळील अग्यायरीला भेट देतात. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. हा दिवस पतेती म्हणून ओळखला जातो.आणि यंदाही पुण्यातील कॅम्प येथील सर जमशेटजी जेजीभाई अग्यायरी येथे मोठ्या संख्येने पारशी समाजातील नागरिक हे एकत्र येत पतेती साजरी करतात.आणि त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे पारसी नव वर्ष. या दिवशी सर्व लोक एकमेकांना भेटतात व आनंदाने हा दिवस साजरा करतात. यावेळी प्रार्थना तसेच वेगळे वेगळे नाटक खेळ विविध आनंदोत्सव या दिवशी साजरे केले जातात.
भारतात शहेनशाही कॅलेंडरनुसार होते नववर्षाची सुरुवातभारतात पारशी हा अत्यंत लहान समुदाय आहे. हा समुदाय शहेनशाही फसली आणि कदिमी अशा तीन विभागात विभागला आहे. भारतातील पारशी लोक शहेनशाही कॅलेंडर नुसार नववर्ष साजरे करतात. त्यामुळे भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारसी नवनवर्षाचा पहिला दिवस असतो आणि तो नवरोज म्हणून साजरा केला जातो. ही सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. असा नवरोझचा अर्थ होतो. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना केली जाते आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.