पुणे -रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील 77 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले असून यातील सपना पठारे ही देखील खारक्यूमध्ये अडकली आहे. भारत सरकारने आमच्या मुलांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने पावले उचलावित, अशी भावना सपना पठारेच्या आई सविता पठारेंनी व्यक्त केली आहे.
सरकारने लवकरात लवकर आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे; युक्रेनमध्ये अडकलेल्या सपना पठारेच्या आईची हाक - आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे
युक्रेनमधील खारक्यू येथे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. आमच्या मुलांना हॉस्टेलमधील अंडरग्राउंड येथे ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना गेल्या दोन दिवसांपासून हल्लाचे आवाज येत असून मुलांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमचे सरकारला आवाहन आहे, की लवकरात लवकर मुलांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सविता पठारे यांनी केली आहे.
सविता पठारे
Last Updated : Mar 1, 2022, 5:48 PM IST