पुणे - वर्गात गोंधळ घातल्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना रास्ता पेठ भागातील एका शाळेत घडली. एका पालकाने याबाबत तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलिसांनी तीन शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.अँथोनी बेकील डिसोझा, गणेश मारुती धोकडे, फरीद मेहबूब पटेल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत.
विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी पालकांची तक्रार, शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल
वर्गशिक्षक अँथोनी यांनी मुलांना छडीने मारहाण केली. मुलांना गुडघ्यावर बसण्याची शिक्षा दिली. त्यानंतर शिक्षक धोकडे, पटेल यांनी मुलांना मारहाण केली तसेच अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत कमी गुण देण्याची धमकी देण्यात आली, असे पालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलगा घरी आला तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याने शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले, तक्रारीत म्हटले आहे.
मुलांना छडीने मारहाण - याबाबत एका पालकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पालकांचा मुलगा रास्ता पेठेतील ऑर्नेलाज शाळेत दहावीत आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा आणि त्याचा मित्र वर्गात गोंधळ घालत होते. वर्गशिक्षक अँथोनी यांनी मुलांना छडीने मारहाण केली. मुलांना गुडघ्यावर बसण्याची शिक्षा दिली. त्यानंतर शिक्षक धोकडे, पटेल यांनी मुलांना मारहाण केली तसेच अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेत कमी गुण देण्याची धमकी देण्यात आली, असे पालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलगा घरी आला तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याने शिक्षकांनी मारहाण केल्याचे सांगितले, तक्रारीत म्हटले आहे.