पुणे- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. मात्र, मुलांचे लसीकरण होऊन शाळा सुरू करणे अपेक्षित होते, अशी भूमिका पुण्यतील पालक संघटनेच्या अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
बोलताना पालक संघटनेच्या अध्यक्षा मुलांचे लसीकरण करणे गरजेचे
यापूर्वी शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीण भागात पाचवी ते 12 वीपर्यंत शाळा-कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, अशावेळी लसीकरणाशिवाय प्राथमिक शाळा सुरू करण्याआधी मुलांचे लसीकरण करणे गरजेचे आहे, असे पालक संघटनेचे अध्यक्ष जयश्री देशपांडे म्हणाल्या.
मुलांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर
पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीच्या पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्गही सुरू करण्यात आल्यामुळे आता राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती कोरोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. याबाबतचे आदेश शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
हे ही वाचा -Maharashtra Primary Schools : राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू