पुणे - पुण्यातील पद्मजा लाखे आणि नक्षत्रा भाटे या दोघींनी भारतीय हस्तकला जगभरात पोहोचिण्यासाठी पालखी नावाचे स्टार्टअप ( Palakhi ) सुरू केले आहे. कोरोनाकाळे दरम्यान वोकल फॉर लोकल ( Vocal for Local ) हा टॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाला. त्यामुळे विविध कारागिरांना लोकप्रियता मिळाली. पण, त्यांना पुरेसा नफा मिळत नव्हता. अशाच कारागिरांना पालखीने एकत्र केले. देशातील सुमारे चार हजार कारगिरांबरोबर काम सुरू केले आहे.
एकीकडे भारतीय हस्तकलेला न मिळणारा वाव आणि कोरोनामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. अशावेळी काही कलाकारांनी कर्ज घेतले तर काहींनी आपल्या जमिनी विकल्या तर काहींनी आपला व्यापारच सोडला. त्या कलाकारांची हीच स्थिती लक्षात घेऊन या दोघींनी पालखी बनवायचा विचार केला.